31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; तरुण ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; तरुण ताब्यात

मुंबई : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान मुंबईतून मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कार घुसविण्याचा आणि त्यांच्या ताफ्याचा पाठलाग करण्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सगळीकडे धामधूम सुरू आहे. काल तिस-या टप्प्यातील मतदान झाले. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मराठवाड्यात मतदान झाले. दरम्यान मुंबईत एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका तरुणाने कार घुसविण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हा प्रकार का केला, याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत लेन क्रमांक ७ मध्ये आला. याच मार्गिकेवरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. पोलिसांनी कारचालकाला त्वरित लेन ६ मध्ये जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सुसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. कार ताफ्याच्या मागोमाग घुसवत तोदेखील वरळीच्या दिशेने जाऊ लागला. पोलिसांनी वरळी वाहतूक विभागाच्या मदतीने त्याला थांबविले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR