24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमुरुडकरांची मांजरा धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा संपली

मुरुडकरांची मांजरा धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा संपली

लातूर : प्रतिनिधी
मांजरा धरणातून मुरुड गावास राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी योजनेच्या प्रस्ताव दाखल केल्यापासून सलग १३ वर्ष पाठपुरावा करण्यात आला. मांजरा धरण ते जलशुद्धीकरण केंद्र या पाईपलाईनची टेस्टिंग घेण्यात आली. त्यानुसार जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आले. त्या पाण्याचे जलपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप नाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सदरील पाणी हे श्री मुरूर्डेश्वर मंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर, श्री हनुमान मंदिर या सर्व ठिकाणी जाऊन पूजन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच अभयसिंह नाडे, माजी उपसरपंच आकाश कणसे, दीपक पठाडे, कै पद्मश्री डॉ आप्पासाहेब पवार प्रतिष्ठान, मुरुडचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तवले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता नाडे, गोपाळ नाडे, प्रा. अंकुश नाडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णू घुटे, अक्षय चव्हाण, सतीश मिसाळ, पप्पू सुरवसे, दत्ता माळी, अशोक साबळे, राजाभाऊ भोरकर, पप्पू पांगळ, राजू माकने, ज्ञानेश्वर नाडे हे उपस्थित होते. मांजरा धरणातून मुरुड गावास राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले होते.

सदरील कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे २०१२ मध्ये दाखल केला होता. त्या अनुषंगाने सहा वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये सदरील कामास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेनंतर जानेवारी २०२० मध्ये सदरील कामात सुरुवात झाली. सलग ४ वर्ष सदरील योजनेचे काम सुरू होते. यामध्ये मांजरा धरणात हेडवर्क, १२५ एचपी च्या दोन मोटरी, मांजरा धरण ते मुरुड २७ किलोमीटर पाईपलाईन ८.५ एम एल डी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र १८ लाख लिटर व १० लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ व गावांतर्गत ५५ किलोमीटर पाईपलाईन हे सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR