24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमोदींच्या दौ-यापूर्वी कॅनडातील ड्रग्ज, खलिस्तान्यांवर कारवाई

मोदींच्या दौ-यापूर्वी कॅनडातील ड्रग्ज, खलिस्तान्यांवर कारवाई

 

टोरॅँटो : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौ-याआधी मार्क कार्नी सरकारने खलिस्तान्यांविरोधात ऑपरेशन सुरु केले आहे. भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तान्यांना पकडण्यासाठी कॅनडा सरकारने ऑपरेशन सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत कॅनडा पोलिसांनी एका मोठ्या ड्रग आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला. कॅनडा पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग जप्तीची कारवाई केली आहे. यात ४७९ किलोग्रॅम कोकेन आहे. त्याची किंमत ४७.९ मिलियन डॉलर आहे. कॅनडामध्ये राहणा-या सात भारतीय वंशाच्या लोकांसह एकूण नऊ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनुसार हा गट अमेरिका आणि कॅनडामधील कर्मशियल ट्रॅकिंग रुटचा वापर करत होता. यांचा संबंध मॅक्सिकन ड्रग कार्टेल आणि अमेरिकी डिस्ट्रिब्यूटरशी होता. ड्रग व्यापारातून मिळणा-या पैशाचा वापर भारत विरोधी कारवाया उदहारणार्थ विरोध प्रदर्शन, जनमत संग्रह आणि शस्त्रास्त्र खरेदी यासाठी केला जातो. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ या नेटवर्कचे समर्थन करत असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय आहे. आयएसआय मॅक्सिकन कोकेन आणि अफगान हेरॉइनच्या तस्करीसाठी कॅनडामधील खलिस्तानी गटांचा वापर करत असल्याचा संशय आहे. साजगिथ योगेन्द्रराजा, मनप्रीत सिंह, फिलिप टेप, अरविंदर पोवार, करमजीत सिंह, गुरतेज सिंह, सरताज सिंह, शिव ओंकार सिंह आणि हाओ टॉमी हुइन्ह यांना अटक करण्यात आली.

जी-७ शिवाय पीएम मोदी आणि कार्नी यांची स्वतंत्र बैठक होईल. दोघांच्या बैठकीत खलिस्तानच्या मुद्यावर चर्चा होऊ शकते. भारत खलिस्तान्यांविरोधात कारवाईची मागणी करु शकतो. जस्टिस ट्रुडो यांच्या कार्यकाळात कॅनडात खलिस्तान्यांची हिम्मत वाढली होती. ट्रुडो यांच्या धोरणामुळे भारत आणि कॅनडा यांचे संबंध बिघडले. ट्रुडो यांनी खलिस्तान समर्थक निज्जरसाठी आवाज उठवला होता. भारतावर पुराव्यांशिवाय आरोप केले. भारताशी पंगा घेणं ट्रुडो यांना महाग पडलं. त्यांची सत्ता गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR