31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयमोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार!

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार!

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोबाईलचे रिचार्ज महागले आहेत, अशी तक्रार नेहमीच केली जाते. मात्र आजकाल मोबाईलशिवाय कोणतेही काम होणे जवळपास अशक्य आहे. काहीही झाले तरी लोक रिचार्ज करतातच. रिचार्जचा दर हा कमी केला पाहिजे, अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते. असे असतानाच आता टेलकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना दणका देण्याच्या तयारीत आहेत.

एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया यासारख्या टेलकॉम कंपन्या लवकरच आपले रिचार्ज प्लॅन आणखी महाग करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी याआधी जुलै २०२४ मध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. तेव्हापासून लोकांना अतिरिक्त पैसे देऊन इंटरनेट आणि कॉलिंग पॅक घ्यावे लागत आहेत. त्यानंतर आता आणखी एकदा या टेलकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भविष्यात मोबाईल रिचार्ज आणखी महागणार आहे.

देशभरात ५ जी सर्व्हिस चालू झाल्यामुळे सर्वच टेलकॉम कंपन्यांनी जुलै २०२४ मध्ये रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर ५ जी नेटवर्कचा विस्तार आणि वाढता तांत्रिक खर्च यामुळे पुन्हा एकदा रिचार्जचे प्लॅन वाढवले जातील, असे सांगण्यात येत आहे. सोबतच टेलकॉम कंपन्या स्पेक्ट्रक खरेदी आणि पायाभूत सुविधा यासाठी लागणारा खर्च भरून निघावा, यासाठीही रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

वर्षाखेर बसणार भुर्दंड
या वर्षाच्या शेवटपर्यंत टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या रिचार्जचे प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये रिचार्ज प्लॅन्सच्या किंमत वाढीचा फटका बसू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR