31.2 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रमोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपींसह ८ जण अटकेत

मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपींसह ८ जण अटकेत

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारे आणि दुचाकीदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, जमिनीचा वाद आणि पैशाच्या कारणावरून ही हत्या झाली असल्याचे समोर आले आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी-शिरवळदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुतारदरा येथील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहर, ग्रामीण परिसर, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली. सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ संशयित मोटारीचा पाठलाग करून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) याच्यासह आठ आरोपींना ताब्यात घेतले. जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR