मुंबई : प्रतिनिधी
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता मोहसिन खानने आपल्या प्रेमाची कबुली दिली. नुकताच त्यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याचे खास फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच अभिनेता मोहसिन खानने साखरपुड्याचे फोटो टाकत आपल्या जोडीदारासाठी एक खास नोट देखील लिहिली आहे.
मोहसिन खानने आपली गर्लफ्रेंड तमन्नासोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मोहसिन खानने पांढ-या रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा सुंदर ब्लेझर घालून आणि लाल रंगाची टाय बांधून लूक पूर्ण केला आहे. तर तमन्नाने लाल रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे. केसांची सुंदर हेअरस्टाईल, मेकअप आणि ज्वेलरी परिधान करून तिने हा लूक पूर्ण केला आहे. दोघे एकत्र खूपच आनंदी दिसत आहेत. तमन्ना बोटातील साखरपुड्याची डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
















