लातूर : प्रतिनिधी
ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या अखंड जयघोषात लातूर परिसरातील खंडापूर येथे सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सत्संगात समितीच्या वतीने आयोजित संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम, हभप महेश महाराज माकणीकर, हभप किशोर महाराज शिवनीकर, हभप रेड्डी महाराज, हभप शाम बरूरे, जागृति शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, संभाजी सुळ, बाळासाहेब कदम, गुरुनाथ गवळी, विकास देशमुख, दयानंद बिडवे, शंकरराव बोळंगे, भैरवनाथ सूर्यवंशी, सुपर्ण जगताप, शिवाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताहाचे निमित्ताने या परिसरात संयोजन समितीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवले असून देश राज्यपातळीवरील विविध कंपन्यांचे स्टॉल, तसेच माहिती प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केले तसेच त्यांनी याप्रसंगी प्रदर्शनातील विविध कंपन्यांची ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टर शेतक-यांना उपयुक्त लागणारी विविध स्टॉलची पाहणी केली सर्वांना शुभेछा दिल्या.

