22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात अटीतटीची लढाई

राज्यात अटीतटीची लढाई

मविआ, महायुतीत फिफ्टी-फिफ्टीचा अंदाज
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यात मतदान संपल्यावर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचे एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आले आहे. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचे दिसत आहे.

एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १७, ठाकरे गटाला ९ जागा मिळतील, अशी शक्यता आहे. याशिवाय शिंदे गटाला ६ जागा आणि अजित पवार गटाला १ जागा मिळू शकते. शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेस पक्षाला ८ जागा मिळू शकतात, असे एक्झिट पोलमध्ये समोर आले आहे. राज्यात महाविकास आघाडीला २३ ते २५ जागा तर महायुतीला २२ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मविआ आणि महायुतीत ५०-५० संधी असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसून येते. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. ठाकरे गटाला ९, काँग्रेसला ८ जागा तर शरद पवार गटाला ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महायुतीत भाजपला १७ जागा, शिंदे गटाला ६ जागा आणि अजित पवार गटाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात दुस-या नंबरचा पक्ष आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपला महाराष्ट्रात १८ तर ठाकरेंच्या शिवसेनेला १४ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

किर्तीकर आघाडीवर
एक्झिट पोलनुसार उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आघाडीवर तर रविंद्र वायकर पिछाडीवर आहेत. शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर तर भाजपचे सुजय विखे पिछाडीवर आहेत. कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू महाराज आघाडीवर तर शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर तर ठाकरे गटाचे विनायक राऊत पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

असे असू शकते जागांचे गणित
भाजप : १७
शिंदे गट : ६
अजित पवार गट : १
ठाकरे गट : ९
काँग्रेस : ८
शरद पवार गट : ६

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR