लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्त मानसी मीना यांच्या प्रसुती रजेमुळे रिक्त झालेल्या जागी मनपाचे नवे आयुक्त म्हणुन राहूल विजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांची बदली करण्यात आली होती. त्यांनी दि. २ जुलै रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.
राहूल कुलकर्णी यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर लगेचच त्यांनी मनपा अधिका-यांची बैठक घेत मनपाच्या कारभाराविषयी समजून घेतले. येत्या काळात लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी ज्या सोयी, सुविधा देण्यात येतील त्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे यावेळी नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी सांगितले.
















