36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूर‘रेकार्ड’वरील दहा गुन्हेगार तडीपार

‘रेकार्ड’वरील दहा गुन्हेगार तडीपार

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी जिल्ह्यातील विविध २३ पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या सराईत आणि अट्टल ९ गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपट्ठी दाादा कायद्यानूसार (एमपीडीए अ‍ॅक्ट) कारवाईचा बडगा उगारत स्थानबद्ध केले. तर दहा अट्टल गुन्हेगारांना  तडीपार केले असून त्यांची वेगवेगळ्या कारागृहांत रवानगी केली आहे.
लोकसभा निवडणुक काळात गडबड, गोंधळ होऊ नये, यासाठी लातूर पोलीसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली जमा केली. त्यांच्यावर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. सतत गुन्हे करणा-या, सामाजिक शांततेला धोका निर्माण करणा-या सराईत, अट्टल गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा (एमपीडीए अ‍ॅक्ट) कायद्यानूसार कारवाई करुन स्थानबद्ध केले आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील हसूर््ल कारागृह, नाशिक कारागृह, लताूर जिल्हा कारागृहासह राज्यातील इतर कारागृहांत थेट रवानगी करण्यात आली आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम १०७ अन्वये तब्बल २ हजार ९२९ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. कलम १०९ अन्वये २० जणांवर, कलम ११० अन्वये २४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कलम ९३ अन्वये ४०७ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR