27.3 C
Latur
Thursday, June 12, 2025
Homeराष्ट्रीयराहुल गांधी आणि सपाचे अखिलेश यादव १० मे रोजी एका मंचावर

राहुल गांधी आणि सपाचे अखिलेश यादव १० मे रोजी एका मंचावर

रायबरेली : काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी कन्नौजमध्ये प्रचार करणार आहेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव कन्नौज लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत.

राहुल गांधी कन्नौजमध्ये येणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. इंडिया अलायन्सची ही पहिली रॅली असेल ज्यामध्ये अखिलेश आणि राहुल गांधी प्रचाराच्या मंचावर एकत्र येतील. दोन्ही नेते रोड शोही करू शकतात, असं म्हटलं जात आहे. याआधी दोन्ही नेते गाझियाबादमध्ये पत्रकार परिषदेत एकत्र दिसले होते.

कन्नौज लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या जागेवर भाजपाकडून सुब्रत पाठक हे उमेदवार आहेत. पाठक यांनी २०१९ च्या निवडणुकीत अखिलेश यांची पत्नी डिंपल यादव यांचा पराभव करून इतिहास रचला होता.

कन्नौजमध्ये, इंडिया आघाडीचे दोन प्रमुख चेहरे, काँग्रेसचे राहुल गांधी आणि सपाचे अखिलेश यादव १० मे रोजी कन्नौजच्या बोर्डिंग मैदानावर एका मंचावरून भाजपाला आव्हान देण्यासाठी निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी येत आहेत.

समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कलीम खान यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची 10 मे रोजी बोर्डिंग मैदानावर संयुक्त जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेनंतर राहुल गांधी, अखिलेश यादवही रोड शो करू शकतात, रोड शोला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR