अहिल्यानगर – लग्नानंतर पाचव्या दिवशीच कुटुंबाला जेवणातून गुंगीचे औषध देऊन दोन नववधूंनी धूम ठोकली. या प्रकरणात चोराची वाडी (ता. श्रीगोंदा) येथील दोन सख्ख्या भावांची पाच लाखांची फसवणूक झाली. या घटनेबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हेलपाटे मारूनही गुन्हा नोंदवून घेतला जात नसल्याची तक्रार संबंधित कुटुंबाने केली आहे.
चोराचीवाडी येथील मोलमजुरी करणा-या दोन सख्ख्या भावांचे लग्न छत्तीसगड येथील दोन मुलींसोबत ठरले होते. त्यासाठी नांदेड येथील एजंटच्या मदतीने या लग्नाच्या मोबदल्यात पाच लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार आधी एक लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने एजंटला देण्यात आले. त्यानंतर २३ मे रोजी वैदिक पद्धतीने हा विवाह पार पडला. लग्नानंतर राहिलेले चार लाख रुपये एंजटला देण्यात आले. दरम्यान, पाच दिवसांनीच नववधूंनी पळ काढला.
















