राज्यात ९ हजार शाळांमध्ये एकच शिक्षक

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘यूडायस प्लस २०२५-२६’ च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. देशात एकशिक्षकी शाळांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होत असताना, महाराष्ट्रात मात्र हे चित्र अगदी उलटे असल्याचे दिसते. राज्यात गेल्या केवळ एकाच वर्षात एकशिक्षकी शाळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून हा आकडा आता ९ हजारांच्या पार गेला आहे.

अहवालातील धक्कादायक आकडेवारीनुसार, राज्यातील एकशिक्षकी शाळांची संख्या अवघ्या एका वर्षात ८,१२५ वरून थेट ९,२६९ वर पोहोचली आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, या शाळांमध्ये सध्या १ लाख ७९ हजार १०४ विद्यार्थी आपले प्राथमिक शिक्षण घेत आहेत.

सरकारच्या संचमान्यता धोरणामुळे शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. अनेक ठिकाणी दोन शिक्षक असलेल्या शाळेतील एका शिक्षकावर दुस-या शाळेची अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाते.

परिणामी, पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी केवळ दोन किंवा तीनच शिक्षक उपलब्ध राहतात आणि शिक्षकांना एकाच वर्गात अनेक इयत्तांचे विद्यार्थी बसून शिकवावे लागते. यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहेत.

‘यूडायस’ मध्ये कंत्राटी शिक्षकांच्या नोंदीचा अभाव
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार राज्यात सुमारे १७ हजार शाळा अशा आहेत, ज्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. नियमानुसार या शाळांना एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक दिला जातो. मात्र, यूडायस प्रणालीमध्ये कंत्राटी शिक्षकांची नोंद ग्रा धरली जात नसल्याने या सर्व शाळा ‘एकशिक्षकी’ म्हणून रेकॉर्डवर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र शिक्षक आवश्यक
विद्यार्थीसंख्येवर आधारित चुकीच्या संचमान्यता धोरणामुळे शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ पडला आहे. पहिली ते सातवीच्या वर्गांना एकत्रित बसवून शिकवण्याची नामुष्की शिक्षकांवर येत आहे. जोपर्यंत प्रत्येक इयत्तेसाठी आवश्यक स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही, तोपर्यंत राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कधीच सुधारू शकत नाही, असे शिक्षक संघटनाचे मत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:08
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56

Latest news