13.6 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहि­णींना आता भाऊबीजेलाही मिळणार पैसे

लाडक्या बहि­णींना आता भाऊबीजेलाही मिळणार पैसे

बीड : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहि­णींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहि­णींना ३००० रुपयांची ओवाळणी लवकरच मिळणार असल्याचे सांगितले.

आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत.

राज्यातील लाडक्या बहि­णींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकांपुरती नसून पुढील ५ वर्षांपर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत. मात्र, त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन या राज्यकर्त्या नेतेमंडळींकडून केले जात आहे.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आतापर्यंत तब्बल २ कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. तसेच, महिन्याला १५०० रुपये जमा होण्याची वाट पाहतात.

राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता ३००० रुपये जमा केला होता. त्यानंतर, सप्टेंबर महिन्यातील १५०० रुपयांचा हप्तादेखील २९ सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता, दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पंकजा मुंडेंच्या पराभवाची सल
राज्यात आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यापैकी दहा टक्के जागा अल्पसंख्याक समाजाला देणार आहे. लोकसभेला आम्ही कमी पडलो, बीडची जागा सहा-सात हजारांनी गेली, आम्हाला वाईट वाटले, असे म्हणत पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अजित पवारांनी बोलून दाखवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR