35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरलातूर लोकसभेसाठी आज मतदान 

लातूर लोकसभेसाठी आज मतदान 

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा (अ. जा.) मतदारसंघासाठी आज दि. ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. त्याकरीता सोमवारी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर मतदान पथके मतदान साहित्यांसह रवाना झाले आहेत.
मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांनी मतदान पथकातील अधिकारी, कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या. लातूर लोकसभा मतदानसंघातून काँग्रेस, भाजपा, बसपा या राष्ट्रीय पक्षांसह एकुण २८ उमेदवार निवडणुक  रिंगणात आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक इको फ्रेंडली, सखी, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र उभे करण्यात आले आहेत. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी मतदान केंद्रावर बियांचे वाटप करण्यात येणार आहे.
तिस-या टप्प्यात लातूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. या मतदार संघात एकुण १९ लाख ७७ हजार ४२ एवढे मतदार आहेत. तर २ हजार १२५ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेत ८ हजार ५०० मतदान अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. बहुतेक मतदान केंद्रावर मतदानांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणुन सावलीची, पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी केले.  उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेवून मतदान केंद्रांवर विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
 त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, मतदारांच्या रांगेच्या ठिकाणी मंडप, मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोलीमध्ये मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या, पंख्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत सर्व मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतदारांच्या आरोग्­याची काळजी घेण्­यासाठी प्रथमोपचार कीटसह आरोग्­य कर्मचारी प्रत्­येक मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात ओआरएस पावडर आणि औषधी उपलब्ध राहतील. जिल्­ह्यातील प्राथमिक आरोग्­य केंद्र आणि ग्रामीण रुग्­णालये यांच्­या कार्यक्षेतत्रात रुग्­णवाहीकेद्वारे आरोग्­य सेवा उपलब्­ध करुन देण्­यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR