30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयपुरुषांना आर्कषित करण्यासाठी पबमध्ये महिलांची नियुक्ती

पुरुषांना आर्कषित करण्यासाठी पबमध्ये महिलांची नियुक्ती

हैदराबाद : आपल्याकडे पब संस्कृती वारंवार टीकेची झोड उठवली जाते. याला पाठबळ देणारी एक धक्कादायक घटना एका पबमध्ये घडली आहे. या ठिकाणी चक्क पुरुषांना भूरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हैदराबाद शहरात हा प्रकार घडला आहे. शहर पोलिसांच्या टास्कफोर्सने या ठिकाणी छापा टाकल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

रविवारी रात्री पोलिसांनी संबंधित पबसह इतर काही ठिकाणी अचानक छापेमारी केली. यावेळी तिथे धक्कादायक बाब समोर आली. यामध्ये पबच्या व्यवस्थापनाने ३२ महिलांना इथे येणा-या पुरुषांना अश्लिल कृत्यांसाठी भुरळ पाडण्यासाठी कामावर ठेवल्याचे आढळले. या महिला पुरुष ग्राहकांकडून पैसे उकळण्यासाठी अश्लील कृत्ये करत होते. टास्क फोर्सच्या डीसीपी रश्मी पेरुमल म्हणाल्या, पबच्या व्यवस्थापनाने महिलांच्या प्रतिष्ठेविरोधात कृती केली आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांना लैंगिक कृत्ये करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर पब आयोजकांनी परवानगी असलेल्या आवाज मर्यादांचे देखील उल्लंघन केले होते.

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून हा अश्लील कृत्यांचा प्रकार इथे सुरु होता. या पबमध्ये देशाच्या विविध भागांतील महिला कामाला होत्या. यामध्ये महिलांनी ऑर्डर केलेले पेय, जेवणाचे बिल आणि सेवेची किंमत संबंधित पुरुष ग्राहकाच्या नावावर फाडले जाते असेही पोलिसांनी सांगितले. अलिकडेच पोलिसांनी बेगमपेठ इथला उर्वशी बार आणि रेस्तराँ देखील याच कारणासाठी बंद केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR