लातूर : प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी एमआयडीसी येथील हॉटेल आरोमा येथे अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात पार पडला. लायन्स क्लबच्या ध्वजवंदनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी इन्स्टॉलेशन ऑफिसर पीडीजी लायन दिलीप मोदी नांदेड यांनी नूतन पदाधिका-यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. माधवराव गव्हाणे उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष अनिलकुमार झंवर, सचिव ईश्वरप्रसाद व्ही. चांडक आणि कोषाध्यक्ष संजय एन. राजुळे यांनी आगामी कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, नेत्रतपासणी, युवा विकास तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास पी. विवेकानंद, डॉ. अजय नारायणकर, शरद मोरे, नागनाथ गित्ते, कृषि उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती शिवाजी हुडे, सत्यनारायण सोनी, ओमजी लोया, गिरीश गर्थे, भालचंद्र रामदास, राजकुमार मुंडडा, जयप्रकाश खटोड, धीरज पलोड, सुरज मुंडडा, राम कांबळे, आनंदशेठ बहेती, महेंद्र दुर्गकर, बंकट भांगडिया, श्रीनिवास जाजू, बाबा भांगडिया, अरविंद लखोटिया, सुनील बेडमुथा, सिद्रामप्पा चाकोते, हरिभाऊ साबदे, सुनील झंवर आदी उपस्थित होते.
















