20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeअंतरराष्ट्रीयविमानांच्या धमक्यांचे लंडन, जर्मनी कनेक्शन!

विमानांच्या धमक्यांचे लंडन, जर्मनी कनेक्शन!

केंद्राकडून गंभीर दखल, आयपी अ‍ॅड्रेस शोधले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या अथवा अफवा समोर आल्या आहेत. यामुळे विमान कंपन्या व त्या-त्या विमानतळ प्रशासनांची पाचावर धारण बसत आहे. या धमक्यांच्या घटनांत वाढ झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत २० हून अधिक धमक्या आल्या आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या धमक्या आयपी अ‍ॅड्रेसवरून आल्या आहेत. ते आयपी अ‍ॅड्रेस शोधून काढले असून ते लंडन आणि जर्मनीमधील असल्याचे समोर आले आहे.

विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्याचा धडाका मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. सोमवारी तीन आंतरराष्ट्रीय विमाने बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या, तर मंगळवारी १० विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या. बुधवारी अशा सहा घटना समोर आल्या. सर्व धमक्या समाजमाध्यमांवरील वेगवेगळ््या अकाउंट्सवरून देण्यात आल्या. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचे समोर आले आहे. या धमक्यांसाठी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला गेला. त्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक्सकडून त्या अकाउंट्सचा आयपी ऍड्रेस मागितला. तसेच हे अकाउंट्स बंद करण्याची विनंती करण्यात आली.

तीन अकाऊंटवरून धमक्या
याबाबतचा प्रारंभिक अहवाल आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये या पोस्ट तीन वेगवेगळ््या सोशल मीडिया अकाउंट्सवरून करण्यात आल्या आहेत. यापैकी दोन अकाउंट्सचे आयपी ऍड्रेस लंडन आणि जर्मनीमधील आहेत. या युजर्सनी पोस्ट करण्यासाठी विशिष्ट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर केला आहे. तसेच तिस-या अकाउंटची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR