15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeनांदेडवेळेवर रुग्णवाहिका न आल्याने महिलेची प्रसूती रस्त्यावर

वेळेवर रुग्णवाहिका न आल्याने महिलेची प्रसूती रस्त्यावर

नांदेड : आरोग्य विभागासाठी राज्य सरकार मोठा निधी खर्च करतो. परंतु, सर्वसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचत नाहीत. त्याचंच एक उदाहरण नांदेड जिल्ह्यातून समोर आलं आहे.

जिल्ह्यातील २२ वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यानंतर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. परंतु, रुग्णवाहिका वेळेत न आल्याने महिलेला रिक्षातून नेण्यात आले. परंतु प्रसूती वेदना तीव्र झाल्यामुळे वाटेतच महिलेची प्रसूती झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रस्त्यालगतच्या शेतामध्ये झाली महिलेची प्रसूती : नांदेड जिल्ह्यातील २२ वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यानंतर नातेवाईकांनी १०८ क्रमांकाला फोन केला. परंतु, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर महिलेला घेऊन नातेवाईकांनी रिक्षातून प्रवास केला. मात्र वाटेतच प्रसूतीकळा वाढल्यामुळे महिलांनी रिक्षा रस्त्यातच थांबवली. यानंतर रस्त्यालगतच्या शेतात गरोदर महिलेची प्रसूती करण्यात आली. यावेळी महिलेने मुलाला जन्म दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR