वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम

मँचेस्टर : वृत्तसंस्था
बॉस बेबी म्हणून ओळखल्या जाणा-या वैभव सूर्यवंशीला अखेर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला, तेव्हा सर्वांच्या नजरा १५ वर्षीय खेळाडूवर खिळल्या होत्या. बिहारच्या वैभव सूर्यवंशीला आज भारतीय टी-२० संघाची कॅप देण्यात आली. अवघ्या १५ वर्षे ९९ दिवस वयाचा असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणासह वैभवने जागतिक विक्रम नोंदविला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले. याशिवाय त्याने जागतिक क्रिकेटमध्येही सर्वांना मागे टाकत विश्वविक्रम नोंदविला. पण पदार्पणात तो फारशी छाप सोडू शकला नाही. कारण तो शॉर्ट बॉलवर स्टम्पिंग होत अवघ्या १४ धावांवर बाद झाला.

भारतासाठी सर्वांत तरुण वयात पदार्पण करण्याचा विक्रम यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. वैभवने अवघ्या १५ व्या वर्षी हा मान मिळवून भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात केली. आयपीएल २०२६ चा हंगाम राजस्थान रॉयल्सच्या अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने पूर्णपणे गाजवला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील एका फलंदाजाची ही सर्वात स्फोटक आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात (१५ वर्षे) सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम त्याने केला. १६ सामन्यात त्याने ७७६ धावा केल्या. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूंत शतक ठोकले. हे आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. तसेच तो टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news