30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरशिवजन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिवजन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

उदगीर : प्रतिनिधी
येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनै दि १३ फेब्रुवारी २०२४ ते २० फेब्रुवारी २०२४ या दरम्यान लोककला महोत्सवात शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत, पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत, भाषण, वेशभूषा यावरील स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत जवळपास २९ शाळा व ११२० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
पारितोषिक  वितरणासाठी  उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, सहाय्यक निबंधक नांदापूरकर  गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उदगीर शहर पोलीस निरीक्षक सोनकवडे, ग्रामीण पोलीस निरीक्षक अरंिवद पवार, एपीआय गायकवाड, सिद्धेश्वर पाटील, सुदर्शन मुंडे, अविनाश रायचूरकर, धनाजी मुळे, श्याम डावळे, बुदे ,कल्पेश बाहेती आदिनाथ कोरे,प्रशांत औटे, चंद्रशेखर पाटील आतनूरकर, अनिल मुदाळे, सुधीर भोसले, मनोज पुदाले, अ‍ॅड दत्ता पाटील  यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभंग जाधव, सुदर्शन पाटील तोंडचिरकर, बिपिन जयवंतराव पाटील, ंिपटू डावळे, भास्कर पाटील ,वसंत पाटील ,कुणाल बागबंदे ,तलाठी अमोल रामशेटी,विवेक जाधव,प्रमोद कालोजी ,शिवा दोडके ,गोपाळ पाटील,संदिप सोनवणे, ,श्रीनिवास एकुरकेकर, अक्षय जाधव,शंकर मोरे,विकास तपशाळे,राजसाहेब कदम,पी.पी पाटील,मनोज पाटील नंदिनी नीटूरे, डॉक्टर ज्योती सोमवंशी, अ‍ॅड. वर्षाताई पंकज कांबळे, सुनील ढगे, बाबासाहेब सूर्यवंशी, गोंिवंद बिरादार, भरत करेपा, प्रदीप पाटील राहुल रक्षले, घाळे भाग्यश्री, बेंजरगे, बिरादार प्रतिभा आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR