32.4 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeलातूररेणापूर तालुक्यात विकास कामांचे लोकार्पण

रेणापूर तालुक्यात विकास कामांचे लोकार्पण

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील वंजारवाडी, निवाडा, आंदलगाव, सिंंधगाव येथे विविध विकासकामांचे लोकार्पण लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू राहील, अशी ग्वाही दिली. वंजारवाडी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. आमदार निधी व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाला ६२.६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निवाडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
एमआरजीएस अंतर्गत १० लाख रुपये, तलाव दुरुस्ती करणे ३१.७४ लाख रुपये , पाणीपुरवठा नवीन डीपी बसवणे ३.५० लाख, मातोश्री पाणंद रस्ते ८० लाख आदी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आले. सिंधगाव येथे आमदार निधीतून दिलेल्या १७ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.  या निधीतून मदनराव गंगणे यांचे घर ते नामदेव गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, विष्णू जाधव यांचे घर ते गणपत रवळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, दगडू कणसे यांचे घर ते श्रीपती धुमाळ  यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता होणार आहे.
आंदलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसह सुमारे ९० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यात आमदार निधीतील १० लाख रुपयांची विकासकामे, जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईन (१६ लाख), गावांतर्गत २० नवीन विद्युत खांब व केबल लाईन (७ लाख), सिमेंट क्राँक्रिट नालीकाम (७ लाख), सिमेंट रस्ता (५ लाख), पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र डीपी (३.३० लाख), १०० केव्हीए डीपी (५.५० लाख), अंगणवाडी इमारत (८.५० लाख), जिल्हा परिषदेंतर्गत ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण (२० लाख) आदी विविध विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, अनुप शेळके, सर्जेराव मोरे, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, उमाकांत खलंग्रे, शेषराव हाके पाटील, स्वाती सोमाणी, उद्धव चेपट, धनराज देशमुख, स्रेहल देशमुख, उमेश सोमाणी, बाळकृष्ण माने, विश्वनाथ कागले, हणमंत पवार, प्रकाश सूर्यवंशी, नागनाथ कराड, पूजा इगे, बाळासाहेब मुंडे, महादेव कुंडूळे, सूर्यकांत मुंडे, बापूराव भांगे, टी. पी. मुंडे, माणिक घुगे, ज्ञानेश्वर सोनटक्के, विकास मुंडे,  बिभीषण कदम, जीवनराव हिप्परकर, तानाजी कांबळे, दिनेश साळुंखे, वंदना साळुंखे, दिलीप उरगुंडे, आबासाहेब बनसोडे, पुनम भांगे, अशोक उरगुंडे, श्रीराम साळुंके,
शाम कस्पटे, रथीकांत उरगुंडे,  रावण फड, संजय मुंडे, हनुमंत  कदम, ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR