मुंबई : प्रतिनिधी
अजित पवारांनी म्हटले होते की, ४२-४५ हजार रुपये महिना मिळतो म्हटल्यावर एकाच घरात ५-५ लोक पी. एचडीला प्रवेश घेत आहेत, असे विधान केले होते. तसेच संशोधक विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या संशोधनाबद्दलही अजित पवारांनी शंका उपस्थित केली होती. मात्र अजित पवारांच्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे.
हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार डॉ. नितिन राऊत यांनी राज्य शासनाच्या बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विहीत वेळेमध्ये न मिळण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी म्हटले होते की, ’४२-४५हजार रुपये महिना मिळतो म्हटल्यावर एकाच घरात ५-५ लोक पी. एचडीला प्रवेश घेत आहेत’, असे विधान केले होते. तसेच संशोधक विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या संशोधनाबद्दलही अजित पवारांनी शंका उपस्थित केली होती. मात्र अजित पवारांच्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे.
रामदास आठवले यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की, शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही, ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, अशा शब्दात आठवले यांनी अजित पवारांना सुनावले.
















