रेणापूर : प्रतिनिधी
मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे रेणा व मांजरा नदी काठी असलेल्या रेणापूर शहरासह तालुक्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना सरसकट एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी रेणापूर शहर व तालुका कॉग्रेसच्या वतीने औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांना देण्यात आले आहे.
ऑगस्ट व सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रेणापूर तालुक्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तुटपुंज्या अनुदानाची घोषना केली मात्र तेही अनुदान अद्यापपर्यंत शेतक-यांना मिळाले नाही तोवरच मंगळवारी रात्री (दि . २८ ऑक्टोबर २०२५ ) रोजी रेणापूर तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी होऊन नदी नाले व ओढ्यांना पूर आला आहे. उरलासुरला घास ही नदी नाल्याच्या ओढ्याच्या पाण्यात सोयाबीनच्या गंजी गंजीही वाहून गेल्या तसेच या पाण्यात शेतक-यांची अवजारे, जनावराचा कडबा, गुळी वाहून गेले आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बीचा हंगाम तरी पदरात पडेल या आशेने शेतक-यांनी घाईघाईने रब्बीची पेरणी केली पण रात्री झालेल्या पावसामुळे शेतक-यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
या नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करून तात्काळ सरसकट ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी. नदी, नाल्या , ओढ्या काठच्या नुकसानीचे तातडीने प्रशासनाने पंचनामे करून शेत-यांना भरीव अशी मदत देण्यात यावी. या मागण्याचे निवेदन रेणापूर शहर व तालुका कॉग्रेसच्या वतीने औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसिलदार प्रशांत थोरात यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अॅड प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, पंडीत माने, शिवाजी पाटील, गोविंद पाटील , अॅड. शेषेराव हाके, भूषण पनुरे, अॅड. प्रशात अकनगिरे, विठ्ठल देशमुख, सचिन मोटेगावकर, जनार्धन माने, प्रकाश सूर्यवंशी,भगिरथ पाटील, वसंत रायनुळे, प्रदिप काळे, हनमंतराव पवार, सचिन इगे, विजयकुमार एकुरके, रोहित गिरी, तात्याराव वाघमारे, बाळासाहेब करमुडे, अजय चक्रे, काशीराम इरळे ‘ डी डी . भांबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त , शेतकरी उपस्थित होते

