शेतक-याला प्रत्यक्ष मदत मिळणार कधी?

रेणापूर: सिद्धार्थ चव्हाण
यावर्षी पावसाअभावी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्यासह ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतक-यांच्या हातातून हंगामच निघून गेला आहे. त्यामुळे शासनाकडून केल्या जाणा-या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे.
खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतक-यांचे उत्पन्नाचे साधनच ठप्प झाले आहे. त्यातच रब्बी हंगामासाठी पेरणीचा खर्च कसा करायचा, बियाणे, खते व मशागतीचा खर्च कसा भागवायचा, याची चिंता शेतक-यांना सतावत आहे. पावसाअभावी विहिरी, नदी-नाले कोरडे पडल्याने रब्बी हंगामाचीही शाश्वती राहिलेली नाही. दुष्काळी परिस्थितीची पाहणी, पंचनामे आणि मदतीच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्ष मदत शेतक-यांच्या खात्यावर कधी जमा होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजी आहे. शासनाने केवळ घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी तसेच रब्बी हंगामासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. घोषणांनी शेतक-यांचा प्रश्न सुटणार नसून, संकटाच्या काळात प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. शासनाने विलंब न करता मदतीची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42
Video thumbnail
Dharashiv|हातातोंडाशी आलेला घासही जळाला; तेरमध्ये शेतकऱ्यावर दुहेरी संकट
02:39
Video thumbnail
Dharashiv|डोळ्यांसमोर पीक करपलं; अखेर शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटावेटर!
03:46
Video thumbnail
Ashok Chavan Audio Clip Viral|दोन दिवस शांत राहा, शिव्या खा!” अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओने खळबळ
00:58
Video thumbnail
वडगाव हातकणंगले महामार्गावरील भीषण अपघात CCTV कॅमेरात कैद. #marathinews #breakingnews
00:25
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळाचा आणखी एक बळी? अहमदपूरमध्ये ६० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
02:32

Latest news