शेरा, समसापूर, गव्हाण येथे नुकसानीची पाहणी

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर व गव्हाण परिसरातील खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या या पाहणीदरम्यान शेतक-यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यात आली.

तालुक्यात यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने तसेच प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतक-यांनी पाहणीदरम्यान सांगितले. नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांचे पंचनामे करावेत, नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी आणि शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई व अन्य मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पीकविमा व शासकीय मदतीसाठी आवश्यक कार्यवाही जलदगतीने करण्याची मागणीही शेतक-यांनी केली.

यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे, लातूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे उपाध्यक्ष गंगासिंह कदम, निवाडा पंचायत समिती सदस्य बालाजी गोटके, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अ‍ॅड. शेषराव हाके, रेणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम माटेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश सूर्यवंशी, हनुमंतराव पवार, शेरा येथील सरपंच जयंत सोनवणे, माधव सोनवणे, बाबूराव पांचाळ, शिवाजी भुरे, सुधाकर सोनवणे, बाळकृष्ण गायकवाड, समसापूर येथील बाळासाहेब गरड, महेश गरड, पपेश दत्त, रामकिशन साबदे, बालाजी बार्लेकर, रामराज फुलसे, अमोल भुजबळ, बाबासाहेब गरड, ज्ञानोबा खोडके तसेच गव्हाण येथील शेतकरी बाळासाहेब पवार, दिलीप पवार, वसंत पवार, राम पवार, ज्ञानोबा पवार, बळीराम शिंदे, निवृत्ती शिंदे, शहाजी पवार आदी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16

Latest news