30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूर‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाची निर्मितीही संघर्षपूर्ण 

‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाची निर्मितीही संघर्षपूर्ण 

लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मितीही तितकीच संघर्षपूर्ण राहिली आहे. कल्पनाशक्तीला कसलाही वाव नसलेल्या या वास्तववादी चित्रपटाची निर्मिती पुर्ण झाली असून  हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे, अशी माहिती या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे व दिग्दर्शक शिवाजी दोलाताडे यांनी दिली.
मराठा आरक्षणसाठी संघर्ष करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाची संपुर्ण टीम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहे. दि. ४ एप्रिल रोजी टीम लातूर शहरात आली होती. त्यावेळी त्यांनी येथील एमआयडीसीतील ‘एकमत’भवनला भेट दिली. त्याप्रसंगी निर्माते गोवर्धन दोलताडे व शिवाजी दोलताडे यांनी संवाद साधला.
‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला ही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आले.
मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो की, मनोज जरांगे पाटील यांची व्यक्त्तिरेखा मला करायला मिळाली. आजवर अनेक वेगवेगळया चित्रपटातून मी  भूमिका केल्या आहेत, पण या चित्रपटातील ही व्यक्तीरेखा मला खुप काही देऊन गेली आहे. संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळया उंचीवर पोहचलेले आहेत. त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्यांचीसुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे.   त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच चित्रपट गृहात पाहाल, अशी मला खात्री असल्याचे अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिति करण्याचा निर्णय घेतला. केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत ही छोटी गोष्ट नाही. त्यांनी आजवर अनेक उपषोण केली हार मानली नाही. माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिति करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणा-या ‘उधळीन जीव…’ या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या टीमने ‘एकमत’भवनला भेट दिली. त्यावेळी जनरल मॅनेजर संदीप तिरुखे, वरिष्ठ उपसंपाद अविनाश जोशी, वशिष्ठ घोडके, विक्रम कातळे यांनी टिमचे स्वागत केले. यावेळी एकमतचे कर्मचारी तसेच पंकज देशमुख, लिंबराज पन्हाळकर उपस्थित होते. सुत्रसंचालन उपसंपादक एजाज शेख यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR