25.1 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळात

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळात

विरोधकांच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

मुंबई:
बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटल्याचे पाहण्यास मिळाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला, आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर दिले.

बीडमध्ये जे झाले ते गंभीर आहे. त्या प्रकरणात वॉचमनने अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. पोलिस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत आहेत. आरोपी बाहेर फिरत आहेत. ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात. बाप तो बाप है म्हटले जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक तालुका अध्यक्ष यात आहे. तीन गुन्हेगार राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. एक मंत्री आहेत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक अण्णा नावाची ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत. असा आरोप दानवे यांनी केला.

आरोपीवर कारवाई होणार
एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला आहे. हे गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. पिआया सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत. आरोपी मंर्त्यांचा जवळचा आहे वगैरे असं बोलणं योग्य नाही. कारण संबंध नसताना मंत्र्यांवर अंगुलीनिर्देश होत असतो. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आरोपी कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल. ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. रकळ मार्फत चौकशी करुन, यामागे जो कोणी असेल त्यांना शोधून काढून कारवाई करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR