Homeलातूरसमसापूर येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

समसापूर येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील समसापुर येथील भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक सिद्धेश्वर तुकाराम गरड यांच्यासह नवनाथ वाघमारे, लहुकांत चव्हाण, विक्रांत भुजबळ,  चंद्रकांत कोरनूळे, बाळु मुदामे व विशाल अंधारे यांनी माजी  आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीण मतदारसंघातील विकासकामे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रेरित होऊन आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे या कार्यकर्त्यांनी  सांगितले. यावेळी माजी आमदार धिरज देशमुख यांनी नवीन सहका-यांचे पक्षात स्वागत करत, काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनता, शेतकरी, युवक आणि महिलांच्या न्यायहक्कासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ट्वेन्टी-वन  शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR