सिया गोयलने चार महिन्यांपूर्वीच चेतनसोबत गुपचूप लग्न उरकले

पुणे : प्रतिनिधी
लोहगड हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकले होते, असा दावा पोलिसांनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सऍप चॅटची तपासणी केली असता, त्यातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा मोठा दावा करण्यात आला आहे.

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपासामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या दोघांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सिया गोयाल आणि चेतन चौधरी या दोघांच्या चौकशीदरम्यान; तसेच त्यांच्या मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सहा ते सात महिन्यांतील डिजिटल माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे. तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या दोघांनी कुटुंबीयांपासून लपवून लग्न केले होते, असेही तपासात समोर आले आहे. हा विवाह केतन आणि सिया यांच्या १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्याच्या आसपासच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हे गुपचूप लग्न नेमकं साखरपुड्याच्या आधी झालं की नंतर, हे स्पष्ट झालेलं नाही.

व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या खुनातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत आता पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांनी केतनच्या खुनासाठी अनेक वेब सिरीज तसेच पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचेही समोर आले आहे. लोहगडावरून ढकलून देऊन व्यावसायिक केतन अग्रवाल याचा होणारी पत्नी सिया गोयल व तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हत्या केली. याप्रकरणात दोघांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर त्यांच्यामधील झालेले संभाषण तसेच चॅटिंग यामधून वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींच्या मोबाईलमधील सहा ते सात महिन्यांपासूनच्या चॅटिंगची सखोल पडताळणी केली.

पॉडकास्ट, व्हीडीओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा, याविषयी माहिती घेतल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल, याबाबत आरोपींनी माहिती गोळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. चाकू किंवा इतर शस्त्र वापरून खून केल्यास पुरावे सहज मिळू शकतात व आरोपी पकडले जाण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष आरोपींनी काढला होता. या गोष्टी घेण्यासाठी कुठेना कुठे जावे लागेल, त्या सांभाळाव्या लागतील अथवा घटनेनंतर त्या लपवून ठेवाव्या लागतील. त्यामुळे कोणतेही शस्त्र न वापरता उंच कड्यावरून ढकलून देऊन खुनाचा निर्णय घेतल्याचे सियाने चौकशीत सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका; लातूरमध्ये अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम
02:47
Video thumbnail
Latur|लातूरच्या क्रीडा संकुलात लाखो लिटर पाणी वाया; प्रशासन झोपेत?
02:36
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 'नो एन्ट्री'!
02:20
Video thumbnail
Latur|आयोध्या प्रकरणाचे पडसाद लातुरात; काँग्रेसचे आंदोलन
05:18
Video thumbnail
Latur|लातुरात भारतीय दलित पँथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन
03:58
Video thumbnail
इंद्रायणीला पूर: आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; भाविकांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन!
01:12
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
06:53

Latest news