धावत्या ट्रेनमध्ये महिलांचा विनयभंग; तक्रार करूनही पोलिसांची मदत नाही

नागपूर : प्रतिनिधी
देवदर्शन करून उत्तर प्रदेशातील वाराणसीहून नागपूरकडे परतणा-या नागपूरमधील एका कुटुंबातील काही महिलांचा दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान विनयभंग करण्यात आला. संतापजनक म्हणजे महिलांनी तक्रार करूनही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नसल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या घटनेने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबीयांसह वाराणसी येथून नागपूरकडे परतत होत्या. त्यांची बुकिंग असल्याने त्या रिझर्व्हेशन डब्यातून प्रवास करत होत्या. मात्र, गाडी सुटल्यानंतर डब्यात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षित डब्यात मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवासी शिरल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. महिलांच्या आरोपानुसार, गर्दीचा फायदा घेत काही प्रवाशांनी धक्काबुक्की केली, अश्लील शेरेबाजी केली तसेच विनयभंग केला.

या प्रकारामुळे महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे हेल्पलाईन १३९ वर संपर्क साधला. मात्र, तत्काळ आणि प्रभावी मदत मिळाली नसल्याचा दावा पीडित महिलांनी केला आहे. महिलांनी रेल्वे पोलिस तसेच स्थानिक पोलिसांकडेही तक्रार केल्याचे सांगितले आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून वेळेत कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही महिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपींची ओळख स्वत:च पटवून द्यावी, असे उत्तरही त्यांना देण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अखेर नैनी रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनासमोर जाऊन रेल रोको आंदोलन केले.

दरम्यान, प्रवासादरम्यान छेडछाडीचे प्रकार सुरूच राहिल्याचा महिलांचा आरोप असून या घटनेमुळे रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांचा प्रवेश रोखण्यासाठी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|सुहागण MGNREGA घोटाळा; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
03:50
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका; लातूरमध्ये अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम
02:47
Video thumbnail
Latur|लातूरच्या क्रीडा संकुलात लाखो लिटर पाणी वाया; प्रशासन झोपेत?
02:36
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 'नो एन्ट्री'!
02:20
Video thumbnail
Latur|आयोध्या प्रकरणाचे पडसाद लातुरात; काँग्रेसचे आंदोलन
05:18
Video thumbnail
Latur|लातुरात भारतीय दलित पँथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन
03:58
Video thumbnail
इंद्रायणीला पूर: आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; भाविकांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन!
01:12
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59

Latest news