24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeपरभणीसेवानिवृत्त एसीपी अ‍ॅड. ढोले पाटील यांची सदिच्छा भेट

सेवानिवृत्त एसीपी अ‍ॅड. ढोले पाटील यांची सदिच्छा भेट

परभणी : प्रतिनिधी
नांदेड येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अ‍ॅड. डी. एन. ढोले पाटील यांनी परभणी येथील अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांची दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अ‍ॅड. डी. एन. ढोले पाटील यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलिस अधिकारी श्री. शिंदे यांची देखील भेट घेवून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेवानिवृत्त एसीपी अ‍ॅड. ढोले पाटील व उपस्थित अधिका-यांनी विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा मारून संवाद साधला. तसेच परभणीतील नवा मोंढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांची देखील सदिच्छा भेट घेवून त्यांनाही सेवानिवृत्त एसीपी अ‍ॅड. ढोले पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित पोलिस अधिका-यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी नांदेड येथील करसल्लागार अ‍ॅड. दिपक मोदाणी, छ. संभाजीनगर येथील उद्योजक अनिल काला, दै. एकमतचे उपसंपादक सुधीर बोर्डे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR