सोलापुरात लवकरच आयटी पार्क सुरू करू

जिल्ह्याला वाढवण बंदराशी जोडणार : मुख्यमंत्री
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे अध्यात्मिक महत्त्व खूप आहे. पंढरपूरला देशभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात. त्यामुळे केवळ पंढरपूर नाही तर जिल्ह्याचे रुप बदलेल, असा विकास करू. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडण्याचे काम आम्ही करणार आहोत असे सांगतानाच लवकरच येथे आयटी पार्कही सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. उजनीच्या पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठीही आपण काम करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच पंढरपूर कॉरिडोअरसंदर्भात व्यापा-यांना विश्वास देत, तुमचा धंदा १० पट वाढेल, असे सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौ-यावर होते. बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांनी महापूजा केली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शिल्पकार येथील जनता आहे, त्यांनतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यानंतर आमदारांची फौज आहे. या सगळ््यांनी मिळून हा विजय खेचून आणला, हा विजय विकासाचा विजय, विकासाच्या मुद्यावर ज्यांचा विश्वास, त्यांचा विजय आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना सांगतो की, अनेकांना वाटते, माझ्यामुळेच मी निवडून आलो. त्यामुळे त्यांचा व्यवहार बदलत जातो. लोक जसा तुमचा विकास पाहतात, तसा तुमचा व्यवहारही पाहतात.

भाजपची परीक्षा ही मोदींनी कामे केले, यावर होणार आहे, पण स्थानिक व्यवहारावरुनही होणार आहे. आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, एखाद्याचे पद गेले तरी चालेल, चांगल्या कामाशी देवाभाऊ पाठीशी. पण चुकलात तर चुकीला माफी नाही, असेही फडणवीसांनी सोलापुरातील नवनिर्वाचित सदस्यांना ठणकावून सांगितले.

आधुनिक रेडिमेड
गारमेंट पार्क करू
सोलापुरात आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क तयार करू, सोलापूरसाठी पाणी आम्ही आणले, आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना केली, असे सांग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच आयटी पार्क सुरू करून शिकलेल्या लोकांना इथेच काम द्यायचा प्रयत्न आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news