तेहरान : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाने केवळ सीमांवरच तणाव वाढलेला नाही. तर यामुळे उमराह यात्रेसाठी निघालेल्या अनेक यात्रेकरूंच्या आनंदावर विरजण पडले आहे. सौदी अरेबियात उमराहसाठी गेलेले जगभरातील यात्रेकरू हवाई सेवा बंद पडल्याने सौदी अरेबियात अडकले आहेत. रमजानच्या काळात ही परिस्थिती उद्भवली असून घरी परतण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. भारतासह, इंडोनेशियापासून ते मलेशियापर्यंतचे यात्रेकरू सौदी अरेबियात अडकले आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धाने आता एक अत्यंत अनपेक्षित आणि धोकादायक वळण घेतले आहे. ज्या इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध रणशिंग फुंकले होते, तोच इराण आता आपल्या शेजारील इस्लामिक देशांच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि अझरबैजान हे तीन देश इराणविरुद्ध एक संयुक्त आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. जर ही युती प्रत्यक्षात आली, तर इराणला अशा युद्धाचा सामना करावा लागेल ज्यातून बाहेर पडणे त्याला अशक्य होईल.

