जालना : शहरातील मियासाब दर्गा येथे खून करणा-या आरोपीची बुधवार दि. १० जुलै रोजी दुपारी खून करून खून का बदला खूनाने घेतल्याने शहर हादरले आहे. पोलिस रेकॉर्डवरील मयत हा खुदरू नावाने कुख्यात होता.
शहरातील मियासाब दर्गा परिसरात सोमवार दि. ८ जुलै रोजी शेख समीर शेख जमील या तरूणाचा एका माथेफिरूने चाकूने वार करून खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना तो मिळत नव्हता. बुधवारी पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. मात्र, या लोकशनची माहिती शेख समीर याच्या काही नातेवाईकांसह मियासाब दर्गा परिसरातील नागरिकांना मिळाली.
पोलिसाने कुख्यात खुसरूला अटक करण्यापूर्वीच चार ते पाच जणांनी मंठा बायपास वरील रेल्वे उड्डाण पुलाखाली त्याला गाठुन भर दिवसा ठेचून मारत खून का बदला खूनाने घेतला आहे. या जामावाने त्याच्या डोक्यावर, गळ्यात धारधार शस्त्राने भोसकून आणि फिरशीने वार करून खून केला. दरम्यान घटनाची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, कदीम जालना, तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस घटनास्थळी येईपर्यंत मारेकरे फरार झाले.
अनेकांच्या मोबाईलमध्ये खून झाला कैद
हा खून होत असताना अनेकांनी या घटनेची चित्रकरण मोबाईलमध्ये केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या चित्रकरणाचा आधार घेऊन मारेक-यांचा शोध सुरू केला आहे.