35.2 C
Latur
Monday, March 10, 2025
HomeFeaturedहरियाणात बस पेटली; ८ मृत, २४ जण भाजले

हरियाणात बस पेटली; ८ मृत, २४ जण भाजले

नूंह : वृत्तसंस्था
हरियाणाच्या नूंहमध्ये शनिवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली आहे. एका प्रवासी बसला आग लागून ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. २४ प्रवासी गंभीररित्या भाजले. आग लागली तेव्हा या बसमध्ये ६० लोक होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

सर्व गंभीर प्रवाशांना मेडिकल कॉलेज नलहड नूंहमध्ये दाखल करण्यात आले. सर्व प्रवाशी हे नातेवाईक होते व ते एका धार्मिक यात्रेसाठी जात होते. हे सर्वजण लुधियाना आणि होशियारपूरचे राहणारे होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावनला गेले होते. तिथून ते माघारी परतत होते.

कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस वे वरून प्रवास करत असताना अचानक बसने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररुप घेतले. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना सावरायला वेळ मिळाला नाही. काही व्हिडीओंमध्ये जळत्या बसमधून प्रवाशांचे ओरडणे ऐकायला येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR