मुंबई : प्रतिनिधी
‘नमो’शेतकरी आणि ‘पीएम’ किसान योजनेत शेतक-यांना दरवर्षी एकूण १२००० रुपये दिले जातात. तर अनेक शेतकरी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. कोणत्याही एकाच योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे, असे विधान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. वर्षाला एकूण १८००० रुपये महिलांना मिळणार आहेत. मात्र, या योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणा-या महिलांना आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, नमो सन्मान योजनेमध्ये शेतक-यांना पैसे दिले जातात. तसेच लाडकी बहीण योजनेतही महिलांना लाभ मिळतो. या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवायचे आहे. लाडकी बहीण योजना की पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांच्या हातात आहे.
नियमाप्रमाणे महिलांना दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्याही एका योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात. प्रधानमंत्री किसान योजना किंवा लाडकी बहीण योजना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवायचे आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याने महिला शेती कामासाठी येत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यावरदेखील माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कामासाठी लाडक्या बहिणी कशाला हव्या. त्यांच्यावर का अवलंबून राहायचं, असे त्यांनी म्हटले आहे.
नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येकी ६-६ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे या योजनेमध्ये १२००० रुपये मिळतात. तर लाडकी बहीण योजनेत वर्षाला १८००० रुपये मिळतात. त्यामुळे महिलांनी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे.