२३ ते २५ सप्टेंबरदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद राहणार

पंढरपूर : प्रतिनिधी
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या मुखदर्शन व पदस्पर्शदर्शनासाठी पूर्णवेळ बंद राहणार आहे. २६ सप्टेंबरपासून दर्शन पूर्ववत सुरू होईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

२२ सप्टेंबर रोजी दिवसभर दर्शन सुरू राहणार असून रात्री दर्शन बंद झाल्यानंतर संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. मूर्तींचे पाविर्त्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवून तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे काम अत्यंत काळजीपूर्वक केले जाणार आहे. मूर्ती संवर्धनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या ७ ऑगस्ट रोजीच्या अंतिम आदेशाने न्यायालयीन अधिमान्यता मिळाली आहे.

यापूर्वी २२ ते २४ जूनदरम्यान संवर्धनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन स्थगिती तसेच त्यानंतर आषाढी यात्रेमुळे हे काम पुढे ढकलण्यात आले होते. मागील काळात १९८८, २००५, २०१२ आणि २०२० मध्ये मूर्तींचे संवर्धन करण्यात आले होते. यावेळी नियमित देखभालीच्या अनुषंगाने मूर्तींना संरक्षक आवरण देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर आणि राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

भाविक व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
या संदर्भात १३ सप्टेंबर रोजी मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, खातेप्रमुख तसेच अरक व राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची नोंद घेऊन वारकरी, भाविक व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news