मुंबई : प्रतिनिधी
आकाशात सोमवारी सायंकाळी एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला. खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे मनोहक दृश्य आकाशात पाहायला मिळाले. आकाशात दिसणा-या नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ तेजस्वी शुक्र ग्रह चमकत असल्याचे दृश्य सर्वांना पाहता आले. हा योगायोग नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमे-यात कैद केला. अनोख्या आकाश दर्शनाने नागरिक आणि खगोलप्रेमींमध्ये कुतुहल वाढलेले पाहायला मिळाले.
आकाशात खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे मनोहारी दृश्य आज पाहायला मिळाले. आकाशात दिसणा-या नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ तेजस्वी शुक्र ग्रह चमकत असल्याचे दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमे-यात टिपले. १४ सप्टेंबर रोजी चंद्र आणि शुक्र ग्रहाची जवळची युती झाली. या खगोलीय घटनेमुळे सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील आकाशात चंद्रकोर आणि त्याच्या शेजारी चमकणारा शुक्र असा सुंदर नजारा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे शुक्र हा आकाशातील सर्वाधिक तेजस्वी ग्रहांपैकी एक असल्याने तो चंद्राच्या शेजारी एखाद्या चमकत्या ता-यासारखा स्पष्टपणे दिसत होता.
या अनोख्या आकाशदर्शनाने नागरिक आणि खगोलप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. सोशल मीडियावर या दृश्याचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ठळकपणे दिसणा-या या खगोलीय घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
मनमोहक खगोलीय दृश्य
आकाशात एक मनमोहक खगोलीय दृश्य पाहायला मिळाले. सोमवारी सायंकाळी अतिशय पातळ चंद्रकोर आणि तिच्या जवळ तेजस्वी दिसणारा शुक्र ग्रह यांची सुंदर चंद्र-शुक्र युती आकाशप्रेमींचे लक्ष वेधून घेत होती. नागरिकांना हे सुंदर दृश्य स्पष्ट पाहता आले.
चंद्र-शुक्र अत्यंत जवळ आल्याने कुतुहल वाढले
आजच्या या खगोलीय सोहळ््यात चंद्र आणि शुक्र एकमेकांच्या अतिशय जवळ आल्याने हे दृश्य विशेष आकर्षक ठरले. खगोलशास्त्रीय गणनेनुसार दोन्ही वस्तूंचा परस्परातील कोनीय अंतरही अत्यंत कमी होते. चंद्राच्या नाजूक कोरीसोबत तेजस्वी शुक्राची ही जोडी आकाशात काही वेळ दिसल्याने अनेक खगोलप्रेमींनी या सुंदर क्षणाचे छायाचित्रणही केले.
















