लातूर : प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे जिल्हयात सार्वजनीक, वैयक्तीक स्वरूपात कामे सुरू होतात. मात्र ती वेळेत पूर्ण होत नसल्याने डोके दुखी ठरत आहेत. जिल्हयात २०२१-२२ व त्यापूर्वी मंजूर झालेली २ हजार ६८ कामे अद्याप अपूर्णच आहेत. या अपूर्ण कामांच्यामुळे नवे कामे मंजूरी करण्यावर परीणाम होत आहे. त्यामुळे शासनाने अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या आहेत.
ग्रामीण भागात शेतक-यांच्या शेतात, गावात नागरीकांची वैयक्तीक व सार्वजनीक विकास कामे व्हावीत व मजूरांच्या हाताला रोजगरा मिळावा म्हणून सार्वजनीक रस्ते, जनावरांचा गोठा, सार्वजनीक व वैयक्तीक विहिर, शौचालय, घरकूल अशी लातूर जिल्हयात २०२१-२२ व त्यापूर्वी ६ हजार ५१६ कामे मंजूर झाली होती. या कामापैकी ४ हजार ४४८ कामे पूर्ण झाली आहेत. तर अद्याप २ हजार ६८ कामे अपूर्णच आहेत. सदर कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सुचना शासनाने रोहयो विभागाला दिल्या होत्या. मात्र अद्याप ती अपूर्णच आहेत. त्यामुळे सदर कामे मार्च अखेर पर्यंत तरी पूर्ण करावेत त्या नुसार सुचना करण्यात येत आहेत.