30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक

ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या संयुक्त कारवाईदरम्यान भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ पाकिस्तानी नागरिकांना सुमारे 90 किलो ड्रग्जसह अटक केली आहे.

सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे गेल्या काही दिवसांपासून एजन्सीकडून कारवाई करण्यात येत होती. त्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गुजरात एटीएससोबत 90 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR