32.1 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeधाराशिवमतदान का करायचे... ?

मतदान का करायचे… ?

कळंब : सतीश टोणगे
आम्ही मतदान केल्यानेच ते नेते, श्रीमंताच्या यादीत जावून बसले. बे हिशोबी मालमत्ता गोळा केली, आणि त्याचा ताळमेळ लागना म्हणून , या पक्षातून त्या पक्षात जाऊ लागल्याची कुजबूज सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

मतदान हे पवित्र दान आहे असे म्हंटले जाते, पण मतदान करून मूलभूत सुविधा मिळाल्या का? साधे प्रश्न का सुटू शकत नाहीत. ग्रामपंचायत पासून ते लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला जातो….निवडून आल्या नंतर सार्वजनिक प्रश्ना कडे लक्ष दिले जात नाही.मग मतदान का करायचे असा प्रश्न सर्व सामान्य माणसाला पडल्या वाचून राहत नाही…. स्वछता, शुद्ध व भरपूर पाणी, विद्युत, चांगले शिक्षण, आरोग्य सेवा …. बस एवढच मागणेअसत..पण ते हि मिळत नाही. वचननाम्यात तर बक्कळ आश्वासने दिलेली असतात, ते पाळले जात नाहीत.मतदान झाले की सर्व काही विसरले जाते…मग मतदान कशाला करायचं….आहो गाडी, बंगला, घेण्या साठी कर्ज उपलब्ध असते पण मुलीच्या लग्नासाठी मात्र शेत गहाण ठेवावे लागते, हि आपल्या देशाची शोकांतिका आहे….

आपल्या गावात , तालुक्यात , जिल्ह्यात नीट आरोग्य सेवा सुद्धा मिळत नाही, उसनवारी करून खाजगी रुग्णालयात जावे लागते. आता तर दवाखाण्या साठी सुद्धा पॉलिसी उपलब्ध आहे. बाहेर देशात जाण्या साठी शैक्षणिक कर्ज हि मिळत आहे…पण ग्राम पातळीवर मात्र सुविधांचा अभाव आहे. विकास व्हावा या साठीच मतदार मतदान करून लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. गुलाल उधलण्या साठी सर्वात पुढे असणा-या कार्यकर्त्याला मात्र, विसरले जाते, मग तुम्हीच सांगा मतदान का करायचे? मतदान तर केलेच पाहिजे , पण मतदान केल्या नंतर, निवडून आल्या नंतर प्रामाणिक कार्यकर्ता कडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे..पण तसे होत नाही.जवळचा लांब जातो आणि लांब असलेल्या सगे सोय-या जवळ कारभार सोपवला जातो. मग तुम्हीच सांगा मतदान का करायचे..,..या निवडणुकीत तर कळसच झाला, कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही.

ज्या मतदारा मुळे ते नेते झाले, त्याच मतदाराला न विचारता, जिथे सोय होईल तिथे नेते मंडळी पळू लागली आहे…मग सांगा कसं मतदान करू वाटेल. आपल्या लाख मोलाच्या मताला हि मंडळी किंमत द्यायला तयार नाहीत. निवडून आल्या नंतर मी कुठे पळणार नाही असे लिहून द्यायला हवे…निष्ठावंत फक्त मतदार राहिला आहे..नेते मंडळी नाही तरी सुद्धा मी तर मतदान करणार आहेच. आपण पण करा …पण मनातील अनेक प्रश्नांची उकल होण्याची गरज आहे..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR