30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीय१५ टन बनावट मसाला जप्त

१५ टन बनावट मसाला जप्त

नवी दिल्ली : तुम्ही घरामध्ये मसाल्यात वापरत असलेले धना पावडर, हळद पावडर आणि इतर मसाले बनावट आहेत की अस्सल हे तपासून घेण्याची गरज आहे. कारण दिल्लीमध्ये तब्बल १५ टन बनावट मसाला जप्त करण्यात आलेला आहे. मसाल्याच्या नावाखाली केवळ लाकडाचा भुसा आणि त्यात अ‍ॅसिडचा वापर करण्यात आलेला होता.

ईशान्य दिल्लीतील करावल नगर भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. दोन मसाल्यांच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात तब्बल १५ टन बनावट मसाले आढळून आले. पोलिसांनी मसाला प्रोसेसिंग युनिटच्या मालकांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. दिलीप सिंह (४६), सरफराज (३२), खुर्सिद मलिक (४२) आ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे लोक मसाल्यांमध्ये भेसळ करुन स्थानिक बाजारपेठेमध्ये मालाची विक्री करत होते. मूळ मसाल्यांच्या तुलनेत कमीकिंमतीमध्ये हा बनावट माल विकला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट मसाल्यांसह पोलिसांनी झाडांची कुजलेली पाने, खराब बाजरी आणि तांदूळ, लाकडाची पावडर, मिरचीचे खोके, अ‍ॅसिड आणि तेल जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पावेरिया यांनी याबाबत माहिती दिली. दिल्लीमधील काही उत्पादक आणि दुकानदार हे संगनमत करुन वेगवेगळ्या ब्रँड्सचे बनावट मसाले विक्री करत होते. दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. डीसीपी पावेरिया म्हणाले की, मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आलेली आहे. एक टीम तयार करुन १ मे रोजी छापे टाकण्यात आले.

कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतले. सिंग आणि सरफराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सिंग हा कंपनीचे मालक असल्याची कबुली त्याने दिली. पुढे तपास केला असता काली खाटा रोड, करावल नगर येथे आणखी प्रोसेसिंग युनिट सापडले. तिथेच सरफराज पकडला गेला. पकडलेल्या दोघांनी २०२१ पासून मसाल्यांचा गोरखधंदा सुर केला होता. यापूर्वी हे दोघे कपड्यांची खरेदी-विक्री करत होते. संशयितांची रवानी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR