35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयसुनीता विल्यम्स तिस-यांदा घेणार अंतराळात झेप

सुनीता विल्यम्स तिस-यांदा घेणार अंतराळात झेप

नवी दिल्ली : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही मंगळवार दि. ७ मे रोजी तिस-यांदा अवकाशामध्ये झेप घेणार असून याहीवेळेस ती भगवद्­गीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत नेणार आहे.

केनेडी स्पेस सेंटर येथून बोइंग स्टार लाइनर हे नवे अंतराळयान सुनीताला घेऊन सकाळी आठच्या सुमारास उड्डाण करेल अशी माहिती सूत्रांनी दिली. गणपतीची मूर्ती माझ्यासाठी लकी असल्याने मी ती सोबत नेत आहे, ही खरोखरच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. याआधीच्या अंतराळ सफरीवर जातानाही सुनीताने भगवद्­गीता आणि गणेश मूर्ती सोबत नेली होती.

सुनीताच्या नावावर काही विक्रमांची याआधीच नोंद झाली आहे. सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी ती महिला अंतराळवीर ठरली आहे. आतापर्यंत तिने सातवेळी स्पेसवॉक केला असून त्याचा कालावधी हा साधारणपणे ५० तास ४० मिनिटे एवढा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR