जळकोट : प्रतिनिधी
दिपावली निमित्त अवघ्या १०० रुपयांत सहा शिधावस्तू वाटपाचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता, अंत्योदय योजना, अन्नसुरक्षा योजना , शेतकरी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर , एक लिटर पामतेलचा संच , १ किलो पोहे व १ किलो रवा दिला जाणार आहे. जळकोट तालुक्यातील जवळपास १६ हजार पाचशो शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे. परंतु दिवाळी अगदी तोंडावर आली असली तरी जळकोट तालुक्यामध्ये अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही . जळकोट येथील शासकीय गोडाऊन मध्येच अद्यापही शासनाच्या पॉकेटमध्ये दिला जाणा-या सर्व वस्तू आल्या नाहीत . केवळ तिनच वस्तू आल्या आहेत . पामतेल , चनादाळ , रवा या वस्तू गोडावून मध्ये आल्या आहेत असे असले तरी सर्व वस्तू आल्यानंतर जळकोट तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांना त्या दिल्या जातात व यानंतर रेशन कार्डधारकांना याचे वाटप होते. परंतु यंदा आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी रेशन कार्डधारकांना मिळणार की नाही याबाबत शासंकता निर्माण झाली आहे .
जळकोट तालुक्यात अंतोदय अन्न योजना ८ हजार ५५९, अन्नसुरक्षा योजनेचे ५७ हजार २०८, तर शेतकरी ७ हजार ३४० असे एकूण ७३ हजार लाभार्थी आहेत, सरकारने दसरा दिवाळी सणांचे औचित्य साधून अवघ्या १०० रुपयांत सहा शिधावस्तू वाटपाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अंत्योदय योजना, केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर व एक लिटर तेल, १ किलो रवा , १ किलो पोहे असा शिधा दिला जाणार आहे.
जळकोट तालुक्यामध्ये जळकोट १४९२ , पाटोदा बुद्रुक ४९८, करंजी २५०, लाळी बुद्रुक २४८, सोनवळा २५९, कोळनुर ३५०, पाटोदा खुर्द २८२, माळहिप्परगा ९४०, हळद वाढवणा २१५, रावण कोळा ६७८, मरसांगवी ३५४, डोंगरगाव २४६ तिरूका ४००, घोणसी ५५०, धोंडवाडी १३७, सुल्लाळी तांडा ३०, सुलाळी १९७,चिंंचोली १६५, अतनूर ३८६, अतनूर तांडा ९४, शेंलदरा २८२, स्वर्गा ७६, वडगाव १४६ , होकर्णा ४२०, उमरदरा २४२, केकत सिंदगी ३३६, वांजरवाडा ७५०, चेरा ५९४, उमरगा रेतू ३९०, जबलपूर ५२०,डोणगाव १८३, धामणगाव ४६५, जिरगा ८३, हावरगा २३९, येलदरा १८४ ,ढोरसांगवी १७९, विराळ १७९, कुणकी ३८०, गव्हाण २८७, मेवापुर २१०, शिवाजीनगर तांडा ११२, शिवाजीनगर तांडा पर्यायी ९४, गुत्ती ४६६, रामपूर तांडा १६६, अग्रवाल तांडा १०२, एवरी १६०, बेळसांगवी २१०, लाळी खुर्द १८७, मंगरूळ ४८६, डोंगर कोणाळी २६, बोरगाव खुर्द १५३ ,एकुरका खुर्द १८०, करंजी ७५२, सोनवळा पर्यायी १६९, सुलाळी तांडा पर्यायी ३९, अतनुर पर्यायी १२० अशा तालुक्यातील ६१ रास्तभाव दुकानांमधून 16हजार ५०० लाभार्थीयांना प्रशासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र जळकोट येथील शासकीय गोदामात आनंदाचा शिधा मधील सर्व वस्तू नाहीत. गतवर्षी देखील आनंदाचा शिधा उशिरा आला होता. असेच अर्धवट वस्तू आल्या होत्या, यावर्षी तरी दिवाळीपूर्वी निदान तीन ते चार दिवस अगोदर रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा मिळावा अशी अपेक्षा जळकोट तालुक्यातील कार्डधारकांची आहे. लवकर आनंदाचा शिदा वाटप झाला तरच शासनाच्या या योजनेचा उद्देश ख-या अर्थाने सफल होणार आहे.