35.5 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeसोलापूरप्लॉट देण्याच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक

प्लॉट देण्याच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक

सोलापूर : प्लॉट देण्याचे आमिष दाखवून मित्रानेच मित्राला १६ लाख ६४ हजारांना फसविल्याची केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रविण रेवू राठोड(वय ३०, रा. मिलीटरी हॉस्पीटल, मासिंगपूर, सिलचन, राज्य आसाम, कायम पत्ता रा. महालक्ष्मी निवास, गट नं. ५, गुरूदेव दत्त नगर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अविनाश अनिल खलाटे (रा. सरडे रोड, फौजी ढाबाशेजारी, राजळे, ता. फलटण, जि. सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण राठोड आणि अविनाश खलाटे हे दोघे मित्र असून दोघेही आसाम येथे सैन्याच्या एका दलात कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये अविनाश खलाटे याने प्रविण राठोड यांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक करायची आहे, त्यासाठी २० लाख रुपये लागतील, तु मला मदत कर, मी तुला सातारा व पुणे येथे चांगला प्लॉट देतो असे सांगितले. त्यामुळे राठोड यांनी खलाटे यास वेळोवेळी गुगल पे, फोन पे तसेच एटीएम मशिनवरून १६ लाख ६४ हजार रुपये ट्रान्सफर केले. पैसे घेऊनदेखील खलाटे याने राठोड यांना प्लॉट दिला नाही. म्हणून मार्च २०२४ मध्ये राठोड यांनी खलाटे यास त्यांनी दिलेले पैसे परत मागितले.

त्यावेळी अविनाश खलाटे याने त्याची बहिण सोनाली खलाटे ही रिअल इस्टेटचे काम पाहात असून तिच्यामार्फत तुला सातारा किंवा पुणे येथे चांगला प्लॉट घेऊन देतो असे म्हणून राठोड यांचा विश्वास संपादन करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणुक केली. पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR