36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशांतिगिरी महाराज शांत; उमेदवारी अर्ज बाद

शांतिगिरी महाराज शांत; उमेदवारी अर्ज बाद

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद झाला आहे. त्यांच्यासोबतच नाशिकमधून एकूण ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर दिंडोरीमधून ५ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

यामध्ये शांतिगिरी महाराज, अनिल जाधव, भक्ती गोडसे यांनी पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून, अनिल जाधव यांनी भाजपकडून तर भक्ती गोडसे यांनी देखील शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर अपक्ष उमेदवारी मात्र कायम आहे. अर्ज छाननीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकूण ११ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २१ नाशिक लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र छाननीत ३६ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR