37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरनान्नज जि. प. शाळेच्या १३ शिक्षकांना नोटीस

नान्नज जि. प. शाळेच्या १३ शिक्षकांना नोटीस

सोलापूर : बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य व गावातील प्रतिष्ठित मंडळी शाळा परिसराची बाहेर स्वच्छता करीत होते. तब्बल १४ वर्गाचे १४ शिक्षक मात्र स्वच्छतेच्या घाणीची काळजी घेण्यासाठी नाकाला रुमाल-पदर लावून दरवाजा पुढे करून वर्गात बसले होते. स्वच्छतेची जबाबदारी असलेले शिक्षक बिनधास्त असल्याने मतदान केंद्राची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या सीईओंनी झाडू ऐवजी पेन हातात घेऊन स्वच्छता केली.

शहरालगतचे अन् सोलापूर-बार्शी रस्त्यावरील गाव शिवाय एक व दोन नंबर अशा दोन जि. प. शाळा अगदी रोड लगतच. उत्तर तालुक्यात व नान्नज गावात महिला शिक्षकांचीच संख्या अधिक आहे. मात्र स्वतः साठी व शाळेतल्या मुलींसाठी स्वच्छ व सुरक्षित टॉयलेट असावे असे इथल्या शिक्षिकांना वाटत नसावे, अशी नान्नजच्या टॉयलेटची अवस्था. जि. प. सीईओ मनीषा आव्हाळे या खर तर मतदान केंद्रांची स्वच्छता करायला आल्या होत्या. मात्र अगोदरच गावकरी व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केल्याने सीईओंनी थेट शाळेची झाडाझडती घेतली. त्यात शिक्षकांचे काम शिक्षणाबाबत कमी असल्याचे दिसून आले.

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी शाळेची तपासणी केल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी नान्नज शाळा-१ व शाळा-२च्या १३ शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसमध्ये शैक्षणिक साहित्याच्या पेट्या पुरवल्या असताना त्याचा वापर केला नाही, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दिलेल्या कपाटांचा वापर केला नाही, स्वच्छतागृह व परिसर अस्वच्छ आढळला, पेपर व्यवस्थित तपासले नाही व गुणही व दिले नाहीत. सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे समान आढळली.

दि. २ मे रोजी शाळा सुरू असताना आपण गैरहजर राहिलात आदी आठ मुद्द्यावर खुलासा मागितला आहे. रमेश शिंदे, हर्षदा देशपांडे, वंदना राजमाने, अनिल राऊत, सुवर्णा घोलप, रतनबाई सपकाळ, अर्चना क्षीरसागर, संजीव नागणे, सोनाली सुरवसे, दत्ता माने, फुलन साठे, संगीता राऊत, कांचन बंदीछोडे आदींना नोटीस बजाविण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR