38.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर२ कोटींचे चंदन बीड जिल्ह्यात जप्त

२ कोटींचे चंदन बीड जिल्ह्यात जप्त

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक मोठा टेम्पो केज पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतला आहे. या टेम्पोमध्ये तब्बल दोन कोटी १८ लाख रुपये किमतीचे अंदाजे सव्वा टन चंदन जप्त करण्यात आले.

पोलिसांनी या टेम्पोच्या चालक वाहकाला अटक केली असून, शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे हे चंदन असल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट झाले आहे. बालाजी जाधव हे बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ता आहेत. त्यामुळे या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले चंदन व टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात असून सदर प्रकरणी वन अधिनियम व भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करुन पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली. सध्या निवडणुकांची आचारसंहिता असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील केजमध्ये पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता चंदनतस्करी उघड झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR