27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरभटक्या विमुक्त जातीला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची

भटक्या विमुक्त जातीला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची

लातूर : प्रतिनिधी
भटक्या विमुक्त जाती समाजाने पिढ्यानपिढ्या काँग्रेसची साथ दिली आहे. भटक्या विमुक्त जाती समाजाचे सर्व प्रश्न सोडविले जातील, भटकंती केल्याशिवाय या समाजाची उपजीविका भागत नाही. या समाजाला न्याय काँग्रेस नेते राहूल गांधी हे देऊ शकतात. असे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री, माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. रविवार दि. ५ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना लातूर शिष्टमंडळाने भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना जाहीर पांिठंबा दिला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोइज शेख, काँग्रेसचे लातूर लोकसभेचे निरीक्षक अमर जाधव, काँग्रेसचे लातूर शहर विधानसभा प्रभारी फरीद देशमुख, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुधीर अनवले, हरिभाऊ गायकवाड, रामराजे आत्राम, अंगद सूर्यवंशी, साहेबआली सौदागर, भाई शिवाजी सुरवसे, प्रदीप धोत्रे, मीरा जोगेश्वरी, केशरबाई गावित, लाला शिंदे, संजय अंधारे, नारायण पुरी, दत्ता जाधव, बळीराम जाधव, मारुती जाकणे, सूर्यकांत साळुंखे, बाबुराव जाधव, केशर बंडगरे, संजय बंडगरे, अर्जुन चव्हाण, नबी शेख, बबन जाधव, राजाराम डांगे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. भटक्या विमुक्त जाती समाजाने काँग्रेसला साथ दिली आहे. भाजप उमेदवार कधीच भटक्या विमुक्त जाती समाजाकडे आले नाहीत, असे सांगून येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.

ओबीसी,व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे हरिभाऊ गायकवाड यांनी बाभळगाव निवासस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR